सप्रेम नमस्कार,
शिक्षक सदैव अध्यापक, संवादक, सह्शोधक, प्रशिक्षक, सुलभक यासारख्या नानाविध भूमिकांमधून
आपल्यासाठी कार्यरत असतात. त्यांना जर माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर अभ्यासासंबंधित
नवनवीन पैलू आपल्या विद्यार्थ्यांसमोर अधिक परिणामकारक पद्धतीने मांडू शकतील अशी खात्री
एम.के.सी.एल. ला आहे. यासाठीच ‘Internet for Teachers’ हा एक तासाचा उत्कृष्ट अनुभव देणारा
अभिनव उपक्रम सुरु केला आहे.
यामध्ये उत्कृष्ट अध्यापनासाठी इंटरनेटवरील काही अतिशय परिणामकारक लिंक्सचा अनुभव
तसेच त्या लिंक्स कशा शोधाव्या याची माहिती शिक्षकांना मिळणार आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण
क्षेत्रांतील जागतिक पातळीवरील उत्तोमोत्तम गोष्टी शिक्षकांकडून समजू शकतील.
‘Internet for Teachers’ हा कोर्स MS-CIT आणि KLiC केंद्रामध्ये उपलब्ध आहे. कृपया आजच नजिकच्या MS-CIT/ KLiC केंद्राला भेट द्या.